मुंबई

प्राचीन शिवमंदिरात ‘हर हर महादेव’चा जागर

CD

अंबरनाथ, ता. १५ (वार्ताहर) : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर परिसरात रविवारी (ता. १५) पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेल्या या शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या असून, ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या महाशिवरात्रीच्या जागरणामुळे शहरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण पाहायला मिळत आहे.

अंबरनाथ येथील तब्बल ९६६ वर्षे जुन्या यादवकालीन हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील अप्रतिम कलाकृती असलेले हे प्राचीन शिवमंदिर दगडी कोरीवकाम, शिल्पसौंदर्य आणि ऐतिहासिक वारशासाठी जगप्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीनिमित्त येथे दरवर्षी भव्य जत्रा भरली जाते. ही पारंपरिक जत्रा अंबरनाथची खास ओळख असून महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात पारंपरिक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, लहान मुलांची खेळणी, मोठमोठे आकाश पाळणे, घरगुती वस्तू, तसेच धार्मिक साहित्याच्या दुकानांनी परिसर सजला आहे.

भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसुविधांसाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. चोख पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता मोहीम, तसेच आपत्कालीन आरोग्य सेवा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची, शौचालयांची आणि दर्शन रांगांचे नियोजन करण्यात आले असून स्वयंसेवक भाविकांना मार्गदर्शन करत आहेत.

भाविकांसाठी विशेष व्यवस्था
नवनिर्वाचित नगरसेवकांनी आणि सेवाभावी संस्थांनी स्टॉल लावून येणाऱ्या भाविकांना प्रसाद, पाणी आणि अल्पोहाराची जागोजागी व्यवस्था केली आहे. तर वयोवृद्ध, लहान मूल आणि गरोदर महिलांसाठीही खास व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी महादेवाचे दर्शन घेत मनोभावे पूजा केली.

पहाटेपासून भाविकांच्या रांगा
लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच शिवभक्त जत्रेचा आनंद घेताना दिसत असून दूरवरपर्यंत लांबच लांब भाविकांच्या रांगा दर्शनासाठी लागल्या आहेत. ढोल-ताशांचा निनाद, भजन-कीर्तन, तसेच आकर्षक विद्युत रोषणाईमुळे जत्रेला वेगळीच शोभा प्राप्त झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT