मुंबई

वसई-विरारमध्ये भाजपचे आंदोलन

CD

वसई-विरारमध्ये भाजपचे आंदोलन
विरार, ता. १५ (बातमीदार)ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर टिपू सुलतानची तुलना करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळां विरोधात वसईतील काँग्रेस भवनसमोर भाजपतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली वसईतील पारनाका येथे आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काँग्रेसची विचारधारा सपकाळांकडून व्यक्त केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. टिपू सुलतानाचे उदात्तीकरण काँग्रेसकडून केले जात आहे. मतांच्या लाचारीसाठी हा प्रयत्न केला जात आहे. सपकाळांच्या वक्तव्यातून छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे, त्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी नगर सेवक मनोज पाटील यांनी केली. यावेळी जिल्हा महामंत्री मनोज बारोट, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष कपिल म्हात्रे, भाजप गटनेते अशोक शेळके, नगरसेवक मनोज पाटील, अभय कक्कड, जितेंद्र पाटील, महेश सरवणकर, गणेश पाटील, निम्मी दोशी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विनीत तिवारी, युवा महामंत्री राजन सिंह, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा अध्यक्ष मॅथ्यू कोलासो, केतन गांधी, शहराध्यक्ष गीतांजली दरिवाला उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT