मुंबई

विवेक विद्यालय, पार्कसाईट, विक्रोळीचे ५३ व्या विज्ञान प्रदर्शनात दिमाखदार यश

CD

विवेक विद्यालय, पार्कसाईट, विक्रोळीचे ५३ व्या विज्ञान प्रदर्शनात दिमाखदार यश
घाटकोपर, ता. १६ (बातमीदार) : विवेक विद्यालय, पार्कसाईट, विक्रोळी या शाळेने नुकत्याच पार पडलेल्या विविध शैक्षणिक व सहशालेय स्पर्धांमध्ये जिल्हा व तालुका स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शिक्षण निरीक्षक कार्यालयामार्फत आयोजित ५३ व्या विज्ञान प्रदर्शनामध्ये लहान गटातील विज्ञान प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. हा प्रकल्प राजेश मोरे व विहान कोकितकर यांनी सादर केला होता.
तसेच दिव्यांग स्तरातील मोठ्या गटाच्या विज्ञान प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळाला. हा प्रकल्प प्रणित मोरे यांनी सादर केला होता.
शैक्षणिक साहित्यनिर्मिती प्रकारात सहाय्यक शिक्षिका मनीषा विवेक थोरात यांच्या साहित्यास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. सहशालेय उपक्रमांतर्गत एकपात्री अभिनय स्पर्धेत समृद्धी साळवे हिने तालुका स्तरावर प्रथम व जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला.
वक्तृत्व स्पर्धेत राजेश मोरे याने तालुका स्तरावर द्वितीय व जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक मिळवला, तर सहाय्यक शिक्षिका स्वाती धुमाळ यांना तालुका स्तरावर तृतीय क्रमांक व जिल्हा स्तरावर उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
याशिवाय तालुका स्तरावरील जाहिरात लेखन स्पर्धेत प्रांजल जाधव हिने द्वितीय क्रमांक, तर निबंध स्पर्धेत अनुष्का वाघमारे हिने तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यालयाच्या या यशाबद्दल मुख्याध्यापकांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले असून, परिसरात त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Dividend Stocks: Oil India, Coal India सह या 46 शेअर्सकडे ठेवा लक्ष! डिव्हिडंड आणि बोनसमुळे चर्चेत; मोठा फायदा होण्याची शक्यता

२ अभिनेत्रींसोबत अफेअर, रंगेहात पकडले गेले तरीही नाना पाटेकरांच्या पत्नीने का नाही दिला घटस्फोट?

Latest Marathi News Update : जळगावमध्ये सोने-चांदीच्या दरात घसरण; जीएसटीसह सोने 1.60 लाखांवर

Rajpal Yadav Granted Interim Bail: राजपाल यादवला ‘चेक बाउन्स’ प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर, मात्र....

SCROLL FOR NEXT