नेरूळ-जुईनगर मार्गावरील रस्ताकामावर प्रश्नचिन्ह
फलकावरील तारखांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम
जुईनगर, ता. १६ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर २ ते जुईनगर रेल्वे फाटक यादरम्यान सुरू असलेल्या रस्ता नूतनीकरणाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कंत्राटदाराने लावलेल्या माहिती फलकावर कामाचा कालावधी १६ जून २०२५ ते १८ जून २०२६ असा नमूद करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र रस्त्याचे काम केवळ तीन दिवसांपूर्वी सुरू झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कामाची मंजुरी कधी मिळाली, प्रत्यक्ष कामाची सुरुवात नेमकी कधी झाली आणि ते पूर्ण होण्याची अंतिम मुदत कोणती, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
सध्या काही ठिकाणी रस्त्याचा वरचा थर काढण्यात आला आहे, तर काही भागात खोदकाम सुरू आहे. त्यामुळे हे पूर्ण नूतनीकरण आहे की केवळ डांबरीकरण अथवा दुरुस्तीचे काम आहे, याबाबत स्पष्टता नाही. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची कोणतीही व्यवस्था न केल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्ताकामासारख्या सार्वजनिक प्रकल्पांबाबत प्रशासनाने पारदर्शक माहिती देणे अपेक्षित असताना फलकावरील तारखांमुळे निर्माण झालेला गोंधळ नागरिकांच्या नाराजीचे कारण ठरत आहे.
चौकट
अधिकृत कालावधी व कामाचा प्रकार जाहीर करण्याची मागणी
कामाचा अधिकृत कालावधी, प्रकल्पाचे स्वरूप आणि पूर्णत्वाची अंतिम मुदत याबाबत संबंधित विभागाने स्पष्ट माहिती जाहीर करावी, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर होऊन वाहतूक नियोजनालाही मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.