मुंबई

धारावीत वीरशरण संत कक्कया महाराज यांची ९२१ वी जयंती उत्साहात

CD

धारावीत वीरशरण संत कक्कया महाराज यांची ९२१वी जयंती उत्साहात
धारावी, ता. १६ (बातमीदार) : १२व्या शतकातील महात्मा बसवेश्वर महाराज यांचे पटशिष्य, थोर समाजसुधारक, संत व क्रांतिकारी योद्धा म्हणून ओळखले जाणारे वीरशरण संत कक्कया महाराज यांची ९२१वी जयंती धारावीत रविवारी (ता. १५) उत्साहात साजरी करण्यात आली.
धारावीत कक्कया (ढोर) समाजाचे नागरिक गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ वास्तव्य करीत असून, चामड्याचा व्यवसाय हा त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. धारावीतील विविध भागांत जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणवाडी येथील भारतभूमी क्रीडा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे श्री कक्कया महाराज पालखी सोहळा उत्साहात पार पडला. गेली २२ वर्षे मंडळ धारावीतील मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित करीत असल्याची माहिती आयोजक सदस्य विजय शिंदे यांनी दिली. पालखीची सुरुवात कल्याणवाडी येथील रंग कारखाना परिसरातून झाली. धारावी मुख्य रस्ता, धारावी कोळीवाडा, काळा किल्ला, संत रोहिदास मार्ग असा मार्गक्रमण करीत पालखीची सांगता संत कक्कया मार्गावरील एन. शिवराज मैदान येथे झाली. या वेळी मोफत आरोग्य शिबिर तसेच महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धारावी, मुंबई तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यातून कक्कया समाजातील नागरिक मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. पालखी मार्गावर विविध मंडळांतर्फे पाणी व शीतपेयांचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Video: फडणवीसांच्या नात्यातील महिला जरांगेंकडे! धनंजय मुंडेंनी त्रास दिल्याचा आरोप

ऑस्ट्रेलियाचा गेम झाला, शेवटच्या सामन्याआधीच T20 World Cup मधून बाहेर; Super-8 मधील ७ संघ ठरले, आता एका जागेसाठी कोण शर्यतीत?

Latest Marathi News Live Update : भाईंदरात १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार, मनसेचा आक्रमक पवित्र्याने आरोपीला अटक

पडद्यावर रोमॅंटिक हिरो पण खऱ्या आयुष्यात पत्नीला अशी वागणूक द्यायचा मिथुन चक्रवर्ती; इतक्या सुंदर बायकोला त्याने...

Yeola News : येवल्यात घरकुलांचा निधी पडून! ५ हजार लाभार्थ्यांनी अजून पायाही खोदला नाही; प्रशासनाकडून नोटिसा

SCROLL FOR NEXT