मुंबई

टीटीसीतील एमआयडीसी भूखंडांवर झोपड्यांचे नव्याने अतिक्रमण

CD

टीटीसीतील एमआयडीसी भूखंडांवर झोपड्यांचे नव्याने अतिक्रमण
भूमाफियांचा सक्रिय डाव; गरजूंची लाखोंची फसवणूक, कारवाईची मागणी तीव्र
वाशी, ता. १६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील टीटीसी औद्योगिक पट्ट्यात एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडांवर अनधिकृत झोपड्यांचे अतिक्रमण पुन्हा वेगाने वाढू लागल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यादव नगर, इलठण पाडा, तुर्भे, दिघा व रबाळे परिसरात भूमाफियांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झोपड्या उभारून त्या गरजू नागरिकांना दोन ते तीन लाख रुपयांना विकण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहारात अनेकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.
काही ठिकाणी अनधिकृत झोपड्यांना पाणीपुरवठ्यासाठी बेकायदा नळजोडणी घेतल्याचेही दिसून आले असून, जुन्या झोपडपट्ट्यांमध्ये दुमजली बांधकामे वाढत आहेत. २०१० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याच्या शासन निर्णयाचा आधार घेत भविष्यात मुदतवाढ मिळेल, या आशेवर नव्याने अतिक्रमणे केली जात असल्याचे बोलले जात आहे. एसआरए योजनेचे प्रलोभन दाखवून झोपड्या वाढविल्या जात असल्याचाही आरोप आहे.
या प्रकारामुळे औद्योगिक विकासासाठी राखीव असलेल्या भूखंडांवर अतिक्रमण होऊन उद्योगांना जागा उपलब्ध होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. स्थानिकांकडून तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
चौकट
पोलसि बंदोबस्तात मोठी कारवाई होणार
एमआयडीसीच्या भूखंडांवरील अनधिकृत झोपड्यांवर टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू असून, आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणे हटवली जातील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. पूर्वीही अनेक भूखंड मोकळे करून उद्योगांना देण्यात आले असून ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाबर आझम जर तुमचा प्रमखु खेळाडू असेल...; भारताच्या माजी कर्णधाराने केला पाकिस्तानचा अपमान! म्हणाले, भारताची 'C' टीम यांना हरवेल

लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी ६; खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Vaibhav Suryavanshi 10th Exam : वैभव सूर्यवंशी दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसणार नाही; जाणून घ्या त्यामागचं कारण...

Water Shortage : पिंपरी चिंचवड शहराला पाणीटंचाईच्या फेब्रुवारीतच झळा; ‘टँकर लॉबी’चे राजकारण असल्याचा नागरिकांचा आरोप

Latest Marathi News Update : काँग्रेस भवनातील गोंधळानंतर पुण्यात आज काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT