पनवेल, ता. १६ (वार्ताहर) : पनवेलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून कामोठेत राहणाऱ्या महिलेसोबत ओळख वाढवून तिला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार, तसेच तिची सुमारे १२ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. अक्षय रंगराव पाटील (वय ३३) या संशयित आरोपीला कामोठे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
३२ वर्षीय पीडित आणि अक्षय पाटील हे दोघेही घटस्फोटीत असून, त्यांनी लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर लग्नासाठी आपली नोंदणी केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये अक्षयने पीडित महिलेसोबत संकेतस्थळावरून ओळख वाढवून तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्याने पीडितेचा विश्वास संपादन करत, तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, तसेच त्याने व्यवसायासाठी आणि वैयक्तिक अडचणींचे कारण सांगून महिलेकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. तसेच त्याने पीडितेच्या नावावर बँक कर्ज काढण्यास भाग पाडले. त्यातून आलेली रक्कम त्याने स्वत:साठी वापरली. ही फसवणूक लक्षात येताच पीडित महिलेने रविवारी (ता. १५) कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.