पन्नाशी पार मिलिंद जाधव यांची थरारक दुर्ग मोहीम
छत्रपतींच्या प्रेरणेने सर केला भैरवगड
कोप्रोली, ता. १६ (बातमीदार) : सह्याद्रीच्या दुर्गम रांगांमधील अत्यंत अवघड आणि धोकादायक समजल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मोरोशीजवळील भैरवगडाची यशस्वी मोहीम श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गप्रेमी मिलिंद जाधव यांनी पूर्ण केली. वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही त्यांनी दाखवलेल्या या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या या मोहिमेला वयोवृद्ध आईचा मिळालेला पाठिंबा विशेष प्रेरणादायी ठरला.
शिवशौर्य ट्रेकर्सच्या वतीने आयोजित या मोहिमेत मुंबई, ठाणे व आंबेजोगाई परिसरातील २१ गिर्यारोहक सहभागी झाले होते. भैरवगडाची चढाई अत्यंत कठीण असल्याने मर्यादित संख्येतच गिर्यारोहकांना सहभागी करून घेण्यात आले.
एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उंच कातळभिंत अशा अरुंद पायऱ्यांवरून चढताना मोठी कसरत करावी लागली. काही ठिकाणी दोरीच्या सहाय्याने पुढे सरकावे लागले. १८१८ मध्ये इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेल्या पायऱ्यांमुळे ही चढाई आणखी धोकादायक झाली आहे. दरीसमोर ठेवून उतरताना धोका अधिक वाढत असल्याने मानसिक व शारीरिक क्षमतेची खरी परीक्षा या मोहिमेत पाहायला मिळाली. दुपारी १ वाजेपर्यंत सर्व गिर्यारोहक सुरक्षितपणे खाली उतरले.
यापूर्वीही मिलिंद जाधव यांनी हरिश्चंद्रगड व कोकणकडा यांसारख्या कठीण मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रेरणेने गडदुर्ग सर करण्याचा त्यांचा ध्यास असून, ही मोहीम इतिहासाशी साधलेला संवाद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या पराक्रमामुळे रायगड जिल्ह्यातील दुर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.