स्थायी समितीला एक महिना पूर्ण; आश्वासनांची पूर्तता कधी?
श्रीवर्धन, ता. १६ (वार्ताहर) : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर मोठ्या उत्साहात स्थापन झालेल्या स्थायी समितीला एक महिना पूर्ण झाला तरी शहरातील मूलभूत प्रश्न जैसे थेच असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. निवडणुकीपूर्वी शहराचा कायापालट करण्याची आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आता या विषयावर मौन बाळगत असल्याचा आरोप होत आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, समुद्रकिनाऱ्यावरील विनापरवाना टपऱ्या, वारंवार फुटणाऱ्या जलवाहिन्या यांसारख्या समस्यांकडे अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व संबंधित नगरसेवकांनी प्रत्यक्ष पाहणीही केलेली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
चौकट
उनाड जनावरांचा वाढता उपद्रव
शहरातील सर्वात गंभीर प्रश्न म्हणून उनाड घोडे, ढोरे व मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव पुढे येत आहे. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची योजना वर्षानुवर्षे रखडलेली असून, जनावरे पकडण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी व कोंडवाड्याचीही व्यवस्था नाही. त्यामुळे अपघातांचा धोका वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच नाट्यगृह, क्रीडा संकुल व पर्यटकांसाठी वाहनतळ यांसारख्या विकासकामांबाबतही कोणतीही ठोस चर्चा न झाल्याने “आश्वासनांची पूर्तता कधी,” असा संतप्त सवाल श्रीवर्धनकरांकडून उपस्थित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.