मुंबई

फांगुळगव्हाण नदीपात्रात विषारी औषध

CD

फांगुळगव्हाण नदीत मासेमारीसाठी विषारी औषध
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; साखरवाडीला टँकरने पाणीपुरवठा

टोकावडे, ता. १७ (बातमीदार) : नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या माळशेज घाट परिसरातील फांगुळगव्हाण ग्रामपंचायत हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तींनी मासेमारीसाठी नदीपात्रात विषारी औषध टाकल्याने खळबळ उडाली असून, यामुळे नदीतील मासे मृत्युमुखी पडले आहेत. या प्रकारामुळे साखरवाडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी दूषित होण्याची भीती निर्माण झाली असून, मानवी आरोग्य आणि वन्यजीवांचा प्रश्न गंभीर बनला आहे.

साखरवाडी गावाला ज्या नदीपात्रातून नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो, त्याच पात्रात मासे पकडण्याच्या उद्देशाने अज्ञातांनी विषारी औषध मिसळले. या औषधामुळे नदीतील जीवसृष्टी धोक्यात आली असून, पाण्याचा दर्जा पूर्णपणे बिघडला आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच नदीतील पाण्यावर अवलंबून असणारे पशु-पक्षी, पाळीव जनावरे आणि ग्रामस्थांच्या जीविताशी हा खेळ खेळला गेल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतीकडून तातडीच्या उपाययोजना
पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवू नये आणि नागरिकांच्या जीवावर बेतू नये, यासाठी फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीने तातडीने पावले उचलली आहेत. नदीतील पाण्याचे नमुने तातडीने शासकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जोपर्यंत प्रयोगशाळेचा अहवाल येत नाही, तोपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून विहिरीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गावासाठी सध्या टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

दोषींवर कारवाईसाठी पोलिस तक्रार
सरपंच सविता भला व ग्रामस्थांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. उन्हाळ्यात पाण्याचे स्रोत आधीच कमी होत असताना, अशा प्रकारे पाणी विषारी करणाऱ्या समाजकंटकांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


विहिरीच्या पाण्याचे नमुने शासकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवाल येईपर्यंत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत साखरवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.
- बाळू कोकणे (ग्राम अधिकारी, ग्रा. पं. फांगुळगव्हाण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सुधारणेचे फायदे मिळणार? मंत्रालयाच्या स्पष्टीकरणाचा अर्थ काय?

गर्लफ्रेंडला संपवलं, नंतर माफी मागायला पनवेलच्या जंगलात पोहोचला; तिच्या आत्म्याला बोलावल्याचा दावा, तरुणाला अटक

Army Recruitment Update : नोकरीसाठी सुवर्णसंधी! माजी सैनिक, वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सैन्य दलात भरती; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार मेळावा?

IRE vs ZIM सामन्यावर पावसाचं सावट; जर मॅच झालीच नाही तर ऑस्ट्रेलियाचं काय होणार? धक्कादायक निकाल

नवी मुंबई महानगरपालिकेवर गणेश नाईकांची एकाधिकारशाही, मंदा म्हात्रे समर्थकांना पुन्हा डावलल्याने भाजपातील अंतर्गत संघर्ष तीव्र

SCROLL FOR NEXT