मुंबई

लोकल प्रवासात दीड लाखांचे दागिने लंपास

CD

लोकल प्रवासात दीड लाखाचे दागिने लंपास
घाटकोपर ते ठाणेदरम्यान चोरी; ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे, ता. १७ : मुंबई उपनगरी रेल्वेमधील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी चोरीच्या घटना पुन्हा समोर येत आहेत. घाटकोपर ते ठाणे प्रवासादरम्यान डोंबिवलीमधील एका शिक्षिकेची तब्बल एक लाख ५८ हजार ९४२ रुपयांची सोनसाखळी आणि पॅन्डल चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार रंजुषा प्रितम (वय ३७) या डोंबिवली पूर्व, गांधीनगर येथील एअर विंग सोसायटीमध्ये वास्तव्यास असून, त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या शनिवारी (ता. १४) त्या मुलीसह अंधेरी येथे आपल्या आईला भेटण्यासाठी गेल्या होत्या. रविवारी (ता. १५) परत डोंबिवलीकडे येताना त्यांनी सकाळी सुमारे ११.३५ वाजता अंधेरी ते घाटकोपर असा मेट्रोने प्रवास केला. सकाळी ११.५० वाजता घाटकोपर मेट्रो स्थानकावर उतरल्यावेळी त्यांच्या गळ्यात सोनसाखळी व पॅन्डल सुरक्षित होते. त्यानंतर त्या मुलीसह घाटकोपर मेट्रो स्थानकातून रेल्वे स्थानकाकडे जात असताना फलाट क्रमांक १ वरील प्रवाशांच्या प्रचंड गर्दीतून चालत गेल्या. दुपारी १२.१० वाजता आलेल्या ‘डाऊन टिटवाळा स्लो’ लोकलच्या महिलांच्या फर्स्ट क्लास डब्यातून त्यांनी प्रवास सुरू केला. मात्र, लोकल दुपारी १२.३० वाजता ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर पोहोचली असता, त्यांना आपल्या गळ्यातील सोन्याची चेन गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी डब्यात तातडीने शोध घेतला, मात्र सोन्याचे दागिने मिळून आले नाहीत.

चोरीच्या घटनेत एक लाख २८ हजार १०२ रुपये किमतीची ११.७५६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि ३० हजार ८४० रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे पॅन्डल असा एकूण एक लाख ५८ हजार ९४२ रुपये किमतीचा ऐवज लंपास झाला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. रेल्वे प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन दागिने लंपास करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''ज्याची भीती होती तेच घडलं..'', ब्लॅक बॉक्सबद्दल रोहित पवारांचं मोठं विधान

Horoscope: उद्या बुधवार शुभ संयोग! मिथुन, सिंह आणि कुंभसह 'या' राशींसाठी १८ फेब्रुवारी ठरेल लाभदायक, तर काहींना सतर्क राहावे लागेल

Shiv Jayanti 2026: शिवजयंतीची सुट्टी मुलांसाठी करा खास! पुण्यातील 'या' संग्रहालयांना भेट देऊन इतिहास जिवंत अनुभवा

Nashik Shiv Jayanti : नाशिकमध्ये शिवजयंतीचा जल्लोष, पण डीजेला 'नो एन्ट्री'; पोलिसांचा कडक बंदोबस्त सज्ज!

Online Gamingचा मुलांच्या मेंदूवर परिणाम? वेळेत ओळखा धोक्याची ‘ही’ 5 लक्षणे!

SCROLL FOR NEXT