सायन स्थानकाबाहेर अवैध पार्किंग
नागरिकांचे रस्त्यावरून चालणे कठीण
धारावी, ता. १७ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या सायन स्थानकासमोरील वाहतूक पूल नूतनीकरण करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे सायन दिशेकडून धारावीत येण्यासाठी वाहतूक बंद करण्यात आली असून, त्याकरिता पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. धारावीतून सायन स्थानकाकडे जाणारा संत रोहिदास मार्ग हा स्थानकाजवळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याचाच फायदा घेत अनेक जण आपल्या दुचाकी या रस्त्यावर उभ्या करून निघून जात असल्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येथे निर्माण होणाऱ्या गर्दीचा फायदा अनेक वाईट कृत्यही होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानकातून धारावीच्या दिशेने बाहेर पडताना येथील पुलावरच एक सरबत विक्रेता अनेक दिवसांपासून जागा अडवून बसलेला असताना, आता त्यात अवैध पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या गर्दीमुळे येथील स्थानिक नागरिक संतापले आहेत. हा रस्ता लवकर मोकळा करावा, प्रवाशांना येेथून नीट चालता यावे यासाठी आम्ही वाहतूक विभागाला वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याची खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग अध्यक्ष संदीप कदम यांनी व्यक्त केली. जर वाहतूक विभागाने वेळीच योग्य कारवाई केली नाही, तर मनसे आपल्या पद्धतीने कारवाई करेल, असा इशारादेखील कदम यांनी या वेळी दिला आहे.
------------
फेरीवालांचाही विळखा
सायन स्थानकातून प्रवास करण्यासाठी येणारे प्रवासी आपल्या दुचाकी रस्त्यावरच उभ्या करून पुढील प्रवासासाठी निघून जातात. पुलाच्या कामामुळे आधीच रस्ता अरुंद झालेला असल्याने प्रवाशांना व पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना त्रास सहन करावा लागतो. त्यातच या अरुंद रस्त्यावर वाहने उभी करून ठेवल्याने तसेच तिथेच असलेल्या फेरीवाल्यांच्या विळख्यामुळे पायी जाणाऱ्या प्रवाशांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.