मुंबई

कल्याण–डोंबिवलीत अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम

CD

कल्याण-डोंबिवलीत अमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम
वर्षभरात सात कोटींचे ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ ः कल्याण-डोंबिवली परिसरात अमली पदार्थांच्या वाढत्या बेकायदा व्यापाराविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. पोलिसांनी वर्षभरात तब्बल सहा कोटी ३६ लाखांच्या ड्रग्जवर जप्तीची कारवाई केली असून, १४६ आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी वर्षभराभरात १०१ गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण परिमंडळ-३चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
कल्याण परिमंडळ-३च्या अमली पदार्थविरोधी विशेष पथकाने मागील वर्षभरात अमली पदार्थ खरेदी-विक्री विरोधात व्यापक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत डोंबिवलीसह परिसरातील विविध पोलिस ठाण्यांत १०१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण १४६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कालावधीत पोलिसांनी सुमारे सहा कोटी ३६ लाख १४ हजार १५० रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला असून, काही गंभीर प्रकरणांमध्ये मकोका कायद्यान्वयेही कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली. पोलिसांनी ही कारवाई विविध माहिती, सापळे आणि विशेष पथकांच्या समन्वयातून राबवली. शहरात कार्यरत असलेल्या अमली पदार्थ विक्री-खरेदीच्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

जप्त केलेल्या अमली पदार्थांचे स्वरूप
गांजा : २४४ किलो ८१८ ग्रॅम
एमडी : १४७ ग्रॅम
चरस : १११ ग्रॅम
नशेचे सिरप : १,८०० बाटल्या

विशेष रणनीती
१ अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या टोळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून, वाहतूक मार्ग, संशयित ठिकाणे आणि संभाव्य वितरण जाळ्यावर सातत्याने नजर ठेवली जात आहे. तरुणांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांनाही प्राधान्य देण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
२ गेल्या काही वर्षांत शहरात वाढत्या शहरीकरणामुळे आणि लोकसंख्येच्या वाढत्या हालचालींमुळे अमली पदार्थांच्या बेकायदा व्यापाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष धोरण आखले आहे. शैक्षणिक परिसर, रेल्वे स्थानके, निर्जन भाग तसेच संशयास्पद गोदामांवर लक्ष ठेवून नियमित छापे टाकले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कारवाई आणखी तीव्र करणार
अमली पदार्थांविरोधातील ही मोहीम पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलिस उपायुक्त झेंडे यांनी स्पष्ट करीत कुठेही अमली पदार्थांची तस्करी किंवा चोरीछुपे खरेदी-विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. शहरातील तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडू नये, तसेच अमली पदार्थांच्या जाळ्याचा पूर्णपणे बंदोबस्त व्हावा, यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: बुधवार पेठेत पुन्हा मोठी पोलिस कारवाई, ११ बांगलादेशी महिलांसह २२ जण ताब्यात; मानव तस्करीचा संशय

MMRDA: मुलुंड मेट्रो अपघातानंतर एमएमआरडीएचा मोठा निर्णय

अजितदादांचं विमान मुद्दाम आदळवलं, पायलट ते DGCAच्या तपासाबाबत रोहित पवारांचे गंभीर आरोप

'ना वायफाय ना इंटरनेट गच्चीवर...' गौतमी पाटीलने ओंकारसाठी घेतला खास उखाणा, VIRAL VIDEO

Latest Marathi News Live Update : मुळशीत रिंग रोड कामादरम्यान भीषण दुर्घटना,डंपर घरावर पलटला

SCROLL FOR NEXT