मुंबई

अखेर साकेत पूल वाहतुकीसाठी खुला

CD

अखेर साकेत पूल वाहतुकीसाठी खुला
ठाणे-नाशिक मार्गावर कोंडीतून काही अंशी सुटका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : मुंबई-नाशिक महामार्गावरील बहुप्रतीक्षित नवीन साकेत उड्डाणपुलाची वजन तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, मंगळवारपासून (ता. १७) हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे ठाण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून, जुन्या पुलाच्या दुरुस्तीचा मार्गही मोकळा झाला आहे.

ठाणे शहरातून जाणाऱ्या जुन्या साकेत पुलाच्या दुरवस्थेमुळे या मार्गावर अवजड आणि हलक्या वाहनांचा वेग मंदावत होता. अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना तासभर कोंडीत अडकून राहावे लागत होते. यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला होता. त्यानुसार, एमएसआरडीसीने ३५ टन वजनाच्या ३१ डम्परच्या सहाय्याने २४ तास पुलाची तांत्रिक तपासणी केली. हा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

नवीन पूल सुरू झाल्याने ठाण्याहून नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक आता अधिक सुरळीत झाली आहे. मात्र, उड्डाणपूल ज्या ठिकाणी संपतो, तिथे रस्ता अरुंद असल्याने चार लेनची वाहतूक पुन्हा दोन लेनवर येते. यामुळे त्या विशिष्ट ठिकाणी वाहनांचा वेग काही प्रमाणात मंदावत असल्याचे दिसून येत आहे.

जुन्या उड्डाणपुलाची होणार दुरुस्ती
साकेत येथील जुना उड्डाणपूल सुमारे ४५ वर्षे जुना आहे. नवीन पूल सुरू झाल्यामुळे आता जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेणे शक्य झाले आहे. सध्या जुन्या पुलावरील ठाण्याहून नाशिककडे जाणारी मार्गिका बंद करण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर, नाशिकहून ठाण्याकडे येणाऱ्या वाहतुकीसाठी ही मार्गिका खुली केली जाणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता सुभाष बोरसे यांनी दिली. या निर्णयामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रवासाचा वेळ कमी होऊन भविष्यात दोन्ही बाजूची वाहतूक अधिक वेगवान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT