मुंबई

‘निसर्गायन’ दृक्‌श्राव्य मैफिलीला ठाणे-डोंबिवलीत भरघोस प्रतिसाद

CD

‘निसर्गायन’ दृक्‌श्राव्य मैफलीला ठाणे-डोंबिवलीत भरघोस प्रतिसाद
काव्य, संगीत, दृश्य आणि सुगंध यांचा अनोखा संगम
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ ः काव्य, संगीत, दृश्य आणि सुगंध यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळालेली ‘निसर्गायन’ ही आगळीवेगळी दृक्‌श्राव्य मैफल रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. शुभसूर क्रिएशन्स निर्मित आणि डोंबिवलीकर प्रस्तुत या मैफिलीचे दोन प्रयोग ठाणे येथील सहयोग मंदिर सभागृह आणि डोंबिवली येथील सुयोग मंगल कार्यालय येथे यशस्वीरित्या सादर झाले.
संगीतकार सुखदा भावे-दाबके यांच्या संकल्पना, लेखन आणि सुरेल संगीतामधून जन्माला आलेली ही मैफल सहा ऋतूंच्या पार्श्वभूमीवर निसर्ग आणि भावना यांच्यातील सुंदर प्रेमकहाणी उलगडते. ऋतुचक्रांमधील बदलत्या भावनांचा सुरेल आणि संवेदनशील अनुभव मिळाल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या.
या कार्यक्रमात गायिका केतकी भावे-जोशी आणि गायक अभिषेक नलावडे यांनी आपल्या सुमधुर आवाजातून भावना आणि निसर्गाचे सुरेल दर्शन घडवले, तर सौरभ सोहोनी यांनी निवेदकाच्या भूमिकेतून निसर्ग-भावनांच्या प्रेमकथेची प्रभावी मांडणी केली. या मैफिलीत कविवर्य मंगेश पाडगावकर, कवयित्री शांताबाई शेळके यांच्यासह नवकवी विक्रांत देशमुख, पराग दाबके आणि सुखदा भावे-दाबके यांच्या गीतांचा समावेश होता.
कार्यक्रमानंतर मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘निसर्गायन’चे आणखी प्रयोग लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सुखदा भावे-दाबके यांनी दिली. नव्या संकल्पना आणि दर्जेदार गीत-संगीत रसिकांसमोर आणण्यासाठी शुभसूर क्रिएशन्स सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

बहुआयामी सादरीकरण
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गाणे आणि निवेदनाशी सुसंगत एलईडी स्क्रीनवरील आकर्षक दृश्यरचना आणि ऋतूनुसार प्रेक्षागृहात हलका सुगंध फवारून तयार केलेले वातावरण. संपूर्ण व्हिज्युअल्सची निर्मिती पराग दाबके यांनी केली, तर सुगंधांची रचना आशिष वैद्य यांनी केली होती. या बहुआयामी सादरीकरणामुळे रसिक पूर्णपणे मैफलीशी एकरूप झाल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT