मुंबई

ई-केवायसी चुकलेल्या अडीच हजार लाडक्या बहिणी अडचणीत

CD

जव्हारच्या बहिणी लाभापासून वंचित
अडीच हजार महिलांची संधी हुकली, विशेष मुभा देण्याची मागणी

जव्हार, ता. १७ (बातमीदार) : जव्हारसारख्या दुर्गम भागात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा फायदा येथील महिलांना मिळत होता, मात्र शासनाने ई-केवायसी बंधनकारक केली आणि येथील अपुऱ्या पायाभूत सुविधांचा फटका त्या महिलांना सोसावा लागला. अतोनात प्रयत्न करूनही तब्बल अडीच हजार महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली नाही. आता फक्त नोंदी चुकलेल्या महिलांना ई-केवायसी करण्याची संधी प्राप्त झाली असल्याने जव्हारमधील महिलांनी विशेष बाब म्हणून आपल्यासारख्या महिलांना पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केलेली आहे.
वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा, नेटवर्कच्या समस्या, शासकीय कागदपत्रांची कमतरता व मोबाईल क्रमांक नसणे यासारख्या असंख्य बाबींमुळे येथील हजारो महिलांची ई-केवायसी होऊ शकली नाही. परिणामी जव्हारमधील या लाडक्या बहिणींना अनुदानापासून मुकावे लागणार आहे. तसं पाहता वाढवून दिलेल्या ३१ डिसेंबर या तारखेपर्यंत तालुक्यातील बहुतांश महिलांना ई-केवायसी करता आली नाही. दरम्यान, ई-केवायसीमध्ये त्रुटी राहिलेल्या महिलांना चुका सुधारण्याची संधी मिळाली असली तरी ज्यांचे ई-केवायसीच झालेले नाही, अशा महिलांबाबत अद्याप सरकारने निर्णय घेतलेला नाही. तांत्रिक अडचणींचा सामना करणाऱ्या परिसरातील महिलांबाबत प्रशासनाने एकदा विचार करावा, अशी मागणी जव्हार तालुक्यातील महिलांकडून करण्यात येत आहे.
ज्या महिलांनी ई-केवायसी केलीच नाही अशा महिलांना केवायसी करण्यासंदर्भात कोणतेही पर्याय सध्या तरी उपलब्ध नाहीत. योजना सुरू झाली होती तेव्हाच अर्ज भरण्याची मुभा होती. त्यानंतर या योजनेमध्ये नवीन महिलांना समाविष्ट करण्यासाठी कोणतेही पर्याय उपलब्ध नाही, अशी माहिती जव्हार पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संदेश दुमाडा यांनी दिली आहे.
-------------------
२१ वर्षे वयाच्या लाभार्थीही प्रतीक्षेत
वयाची २१ वर्षे पूर्ण झालेल्या हजारो तरुणी योजनेमध्ये सहभागी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने या योजनेमधून अपात्र करण्यासाठी रस्ते ठेवलेले आहेत; मात्र योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणताही मार्ग ठेवलेला नाही. वयाची २१ वर्षे झालेल्या हजारो तरुणी योजनेपासून वंचित आहेत. विशेष म्हणजे या लाडक्या बहिणी युवा मतदार असून, देशाच्या भविष्यही आहेत.
---------------
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या ग्रामीण भागात अतिशय उपयुक्त आहे. मात्र माझ्यासह तालुक्यातील ज्या महिलांची डिसेंबरअखेरीपर्यंतही केवायसी होऊ शकली नाही अशा महिलांना पुन्हा एकदा राज्य शासनाने संधी द्यावी. शिवाय ज्या युवतींचे वय २१ वर्षे पूर्ण झाले आहे अशा तरुणींनादेखील योजनेचा लाभ मिळावा, अशी विनंती आहे.
- विशाखा अहिरे, रहिवासी, जव्हार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT