मुंबई

ठाणे होणार वेगवान

CD

ठाणे होणार वेगवान
एमएमआरडीए अर्थसंकल्पात झुकते माप; कोस्टल रोड, मेट्रो, उड्डाणपुलांसाठी आठ हजार कोटी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी मांडण्यात आलेल्या एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी सुमारे आठ हजार कोटींहून अधिक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी कमी करणे, उपनगरांमधील दळणवळण सुलभ करणे आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन कोस्टल रोड, मेट्रो, उड्डाणपूल आणि सागरी वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. अर्थसंकल्पात ठाणे जिल्ह्याला झुकते माप देण्यात आले असून, हे प्रकल्प मार्गी लागल्यास भविष्यात ठाणे वेगवान होणार आहे.

महामुंबईचा विचार केला असता ठाणे हे ग्रोथ सेंटर म्हणून उदयाला येत आहे. अशावेळी ठाण्याची वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी मोठमोठे प्रकल्प आकारला येत आहेत. या प्रकल्पांना आर्थिक बळ एमएमआयडीएने दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने ठाणे कोस्टल रोडसाठी सुमारे १,०२९.५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बाळकूम ते गायमुख या पट्ट्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातो. तसेच ठाणे ते बोरिवलीदरम्यानच्या बोगदा प्रकल्पासाठी सुमारे ३,०२३.२० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित असून, यामुळे ठाणे-पश्चिम उपनगरांतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे.

रस्ते व उड्डाणपूल प्रकल्पांनाही चालना देण्यात आली आहे. फौंडनगर ते साकेत (बाळकूम-गायमुख) मार्गासाठी सुमारे ६००.०७ कोटी रुपयांची तरतूद आहे. काटई नाका येथे उन्नत मार्गासाठी सुमारे ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोलशेत-कल्हेर-भिवंडी जोडणारा पूल तसेच कल्याण खाडी परिसरातील समांतर रस्ते प्रकल्पांमुळे ठाणे, भिवंडी आणि कल्याण परिसरातील दळणवळण अधिक सक्षम होणार आहे.

मेट्रो जाळ्याचा विस्तार
मेट्रो जाळ्याच्या विस्तारातही ठाण्याला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. मेट्रो-४ (वडाळा-कासारवडवली) मार्गासाठी सुमारे १,८५०.३० कोटी रुपयांची तरतूद आहे. मेट्रो-५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) मार्गासाठी सुमारे ५०० कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच मेट्रो १० (गायमुख-मिरा रोड) प्रकल्पासाठी सुमारे २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

औद्योगिक व नवविकास प्रकल्प
रायगड-पेण तसेच खारबाव इंटिग्रेटेड बिझनेस पार्कसारख्या नवविकास प्रकल्पांचाही आराखड्यात समावेश आहे. यामुळे ठाणे आणि लगतच्या भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची शक्यता आहे. एकूणच एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पातून ठाणे जिल्ह्याला रस्ते, मेट्रो आणि सागरी मार्गांच्या माध्यमातून मोठा पायाभूत विकासाचा वेग मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. वाहतूक कोंडी कमी करणे, प्रवासाचा वेळ कमी करणे आणि आर्थिक क्रियाशीलता वाढवणे या तिन्ही उद्दिष्टांसाठी ठाणे आता ‘विकास हब’ म्हणून पुढे येण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रमुख रस्ते व उड्डाणपूल
बाळकुम-गायमुख मार्ग
कल्याण खाडी परिसरातील उड्डाणपूल व समांतर रस्ते प्रकल्प
कोलशेत-कल्हेर-भिवंडी जोडणारा पूल
काटई नाका येथे उन्नत मार्ग

पायाभूत सुविधांना प्राधान्य
एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पातून ठाणे जिल्ह्याच्या वाहतूक व पायाभूत सुविधांच्या विकासाला स्पष्ट प्राधान्य देण्यात आले आहे. वाढती लोकसंख्या, वाढते वाहन प्रमाण आणि उपनगरांचा विस्तार लक्षात घेता, या प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा वेग आणि वेळेत पूर्तता याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT