पनवेल, ता. १७ (बातमीदार) : शहरात गेल्या आठवड्यात एका रिक्षाचालकाने महिला प्रवाशावर जीवघेणा हल्ला केल्याच्या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेत कडक कारवाई केली. या धडक कारवाईत तब्बल १८० रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली असून, ३४ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच एकूण एक लाख ६८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
करंजाडे परिसरात रिक्षात बसलेल्या प्रवासी महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करून तिला लुटणाऱ्या रिक्षाचालकाला पनवेल शहर पोलिसांनी ४८ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय एकनाथ बागडे (वय २७) हा कर्जाच्या विळख्यात अडकल्यामुळे त्याने हा हल्ला करून लूट केल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पनवेल वाहतूक शाखा, पनवेल शहर आणि खांदेश्वर पोलिस ठाणे, तसेच आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली. पनवेल रेल्वे स्थानक, रिक्षा थांबा, तसेच एचडीएफसी सर्कल परिसरात पाच पथकांमार्फत सुमारे ३५० रिक्षांची तपासणी करण्यात आली. अवैध प्रवासी वाहतूक, फिटनेस व विमा कालबाह्य असणे, विनापरवाना वाहनचालक, विनागणवेश तसेच इतर नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.