राज्य माहिती आयुक्तांचे कोपरी पोलिसांवर ताशेरे
प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्याचे आदेश रद्द; कार्यप्रणालीवर खडेबोल
ठाणे, ता. १७ : राज्य माहिती आयुक्त शेखर चन्ने यांनी कोपरी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढत जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय प्राधिकरणाचे आदेश रद्द केले. अर्जदाराला मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने आयुक्तांनी कोपरी पोलिसांना खडेबोल सुनावले. या प्रकरणाची नुकतीच सुनावणी झाली, या वेळी कोपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निशिकांत विश्वकार तसेच पोलिस निरीक्षक प्रदीप केरकर उपस्थित होते.
कोपरी आनंदनगर येथे राहणारे अनंत विष्णू साबळे हे दिव्यांग व्यक्ती असून त्यांनी कोपरी पोलिसांवर खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप करीत पोलिसांकडे, पोलिस ठाण्यातील संंबधित दिवसांचे सीसीटीव्ही चित्रण, पोलिसांनी केलेली चौकशी, त्यांच्याविरोधातील तक्रारी तसेच या प्रकरणाशी निगडित केलेल्या अर्जांवरील कारवाईची माहिती, माहिती अधिकार कायद्याअतंर्गत ५ मे २०२२मध्ये मागवली होती; मात्र पोलिसांनी या अर्जाचा बोध होत नसल्याचे कारण पुढे करीत ही माहिती देण्यास टाळाटाळ सुरू केली होती, त्याविरोधात साबळे यांनी कोपरी पोलिस ठाण्यातील प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे १६ जून २०२२ रोजी प्रथम अपील दाखल केले; परंतु या ठिकाणीही तक्रारदाराच्या अर्जात संदिग्धता तसेच स्पष्टता नसल्याचे कारण पुढे करीत साबळे यांचा अर्ज निकाली काढला, याविरोधात अखेर साबळे यांनी राज्य माहिती आयुक्त कोकण खंडपीठाकडे धाव घेत ४ जुलै २०२२ला द्वितीय अपील दाखल केले.
...
दंडात्मक कारवाईचा इशारा
या प्रकरणाची राज्य माहिती आयुक्त शेखर चन्ने यांच्यासमोर नुकतीच सुनावणी झाली. त्याचा आदेश मंगळवारी (ता. १७) प्राप्त झाला. सुनावणीवेळी पोलिसांनी अर्जाचा बोध होत नसल्याचे सरकारी कारण पुढे केले; मात्र आयुक्तांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत खडेबोल सुनावले. पोलिसांना या आदेशाची प्रत प्राप्त होताच १५ दिवसांच्या आत अर्जदाराला माहिती देण्याचे आदेश देत जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय प्राधिकरणाचे आदेश रद्द केला; मात्र त्यानंतरही पोलिसांनी माहिती देण्यास विलंब अथवा टाळाटाळ केल्यास पोलिसांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे या वेळी सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.