मुंबई

बेलापूरमध्ये झोपू योजना कार्यान्वित होणार

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १७ : गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घर मिळणार आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांची गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासोबत आज (ता. १७) मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत भोयर यांनी बेलापूर येथील शिवाजीनगर झोपडपट्टीच्या पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने आदेश दिले आहेत.

नवी मुंबईतील सिडको आणि जिल्हाधिकाऱ्यांंच्या जमिनीवर ४८ ठिकाणी झोपडपट्टी वसलेल्या आहेत. त्यापैकी एकट्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात सुमारे ७२ हजार ६६५ झोपड्या आहेत. अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात झोडपट्टीतील नागरिक हलाख्याच्या परिस्थितीत राहत आहेत. या लोकांना पुनर्वसनाचे वेध लागले आहेत. दिघा आणि इलठणपाडा येथे पुनर्वसनाचा प्रयत्न झाला होता. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे पुनर्वसन रखडले आहे. त्यानंतर आता म्हात्रे यांनी या प्रकल्पात हात घातला असून, त्यांनी मंत्रालय स्तरावर सकारात्मक बैठक घडवून आणली आहे. त्यानुसार म्हात्रे यांची मंगळवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत डॉ. पंकज भोयर यांच्यासह गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव सुनील दकीरडे, मंत्रालय उपसचिव चं. द. तरंगे, एमएमआरएसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी, एमएमआर ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण उपअभियंता राजकुमार पवार आणि ॲड. संतोष पळसकर आदी अधिकारी उपस्थित होते.

सर्वेक्षणाचे काम सुरू
झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याच्या प्रक्रियेत बायोमेट्रिक सर्वेक्षण, डीएसआर तयार करणे व पात्र व अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तुर्भे येथील शिवाजीनगर झोपडपट्टीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. शासन निर्णयानुसार ३ सी या टप्प्यात पोहोचलेल्या सर्वेक्षणातील पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश भोयर यांनी दिल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच झोपडपट्टीतील रहिवाशांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली. याबाबत आपण लवकरच मेळावा घेणार आहेत. योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कोणते कागदपत्रे सादर करायचे आहेत. याबाबत एक कार्यशाळा घेणार असल्याचेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई शहरात २०११ पर्यंत झोपडपट्टीचे सर्वेक्षण झाले आहे, परंतु आता झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवताना २०२६ पर्यंतच्या झोपड्यांचा विचार केला जाणार आहे. सरकारतर्फे सरकारी जमिनीवर हा प्रकल्प राबवला जाणार आहे.
- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT