मुंबई

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेवर धडक

CD

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेवर धडक
प्रलंबित मागण्यांवरून हजारोंचा मोर्चा; किमान वेतन व १० टक्के आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १७ : रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवार (ता.१६) हजारो कर्मचारी आक्रमक झाले. रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली. काही काळ कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वार अडवून धरल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, राहणीमान भत्ता तसेच जिल्हा परिषद भरतीत १० टक्के आरक्षण यांसारख्या मूलभूत मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असल्याचा आरोप संघटनेने केला. या मागण्यांसंदर्भात १४ जून २०२५ रोजी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि संघटनेच्या शिष्टमंडळामध्ये बैठक होऊन सकारात्मक आश्वासन देण्यात आले होते. मात्र आठ महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कर्मचाऱ्यांचा संयम सुटल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मोर्चा दरम्यान कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. वेतन वेळेवर न मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सेवा निवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांबाबत टाळाटाळ होत असल्याचाही आरोप करण्यात आला. तसेच आकृतीबंधात नावे समाविष्ट करताना ज्येष्ठतेचा विचार करावा आणि रिक्त पदांची माहिती पारदर्शकपणे जाहीर करून १० टक्के आरक्षणानुसार भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही करण्यात आली.
चौकट
मुख्य मागण्या :
- किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी व राहणीमान भत्ता तातडीने लागू करावा.
-वेतन शासनाकडून जमा झाल्यानंतर वेळेत अदा करण्याची सक्ती करावी.
-सेवा निवृत्तीनंतरचे लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी.
-आकृतीबंधात नावे समाविष्ट करताना ज्येष्ठतेचा निकष लागू करावा.
- जिल्हा परिषदेत रिक्त पदांची पारदर्शक माहिती जाहीर करून १० टक्के आरक्षणानुसार भरती प्रक्रिया राबवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Video: फडणवीसांच्या नात्यातील महिला जरांगेंकडे! धनंजय मुंडेंनी त्रास दिल्याचा आरोप

ऑस्ट्रेलियाचा गेम झाला, शेवटच्या सामन्याआधीच T20 World Cup मधून बाहेर; Super-8 मधील ७ संघ ठरले, आता एका जागेसाठी कोण शर्यतीत?

Latest Marathi News Live Update : भाईंदरात १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार, मनसेचा आक्रमक पवित्र्याने आरोपीला अटक

पडद्यावर रोमॅंटिक हिरो पण खऱ्या आयुष्यात पत्नीला अशी वागणूक द्यायचा मिथुन चक्रवर्ती; इतक्या सुंदर बायकोला त्याने...

Yeola News : येवल्यात घरकुलांचा निधी पडून! ५ हजार लाभार्थ्यांनी अजून पायाही खोदला नाही; प्रशासनाकडून नोटिसा

SCROLL FOR NEXT