मुंबई

क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथी दिनी आदरांजली

CD

क्रांतिवीर लहुजी साळवे यांना अभिवादन
कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्य क्रांतिकारक आणि थोर समाजसुधारक क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (ता. १७) कल्याण-डोंबिवली महापालिकेत त्यांना अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात महापौर हर्षाली चौधरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त वंदना गुळवे, रामदास कोकरे, महापालिका सचिव किशोर शेळके आणि कार्यकारी अभियंता संदीप तांबे यांनी लहुजी साळवे यांच्या क्रांतिकार्याला उजाळा देत आदरांजली अर्पण केली. शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे, नगरसेवक राजाराम पावशे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्याचे स्मरण
क्रांतिवीर लहुजी साळवे यांनी स्वराज्य रक्षणासाठी अनेक योद्धे तयार केले आणि समाजातील उपेक्षितांना एकत्र करून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या याच गौरवशाली कार्याचे स्मरण करीत सर्वांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण केली. या कार्यक्रमामुळे पालिका मुख्यालयात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: क्षुल्लक कारण पण अमानुष शिक्षा! हातावर व्रण येईपर्यंत ४० फटके अन्...; टीचरचं विद्यार्थिनीसोबत विकृत कृत्य, काय घडलं?

Holi Horoscope Predictions: होळीनंतर मेषसह 'या' दोन राशींच्या आयुष्यात घडणार मोठे बदल; गुरु मार्गी होताच सुख-समृद्धीचे नवे योग

Latest Marathi News Live Update : "कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक, डेटा गोळा करण्याचं काम सुरु"- चंद्रकांत पाटील

फक्त 6 दिवसांत बदलणार मिथुनसहित तीन राशींचं नशीब; गजकेसरी योगामुळे होणार पैशांची बरसात

Jalgaon News : जळगाव हादरलं! वाळूमाफियांची मुजोरी वाढली, कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ८ वेळा हल्ले

SCROLL FOR NEXT