मुंबई

काळा घोडा कला महोत्सवात महिला बचत गटांची ८.५४ लाखांची भरारी

CD

काळा घोडा कला महोत्सवात महिला बचत गटांची ८.५४ लाखांची भरारी
नऊ दिवसांत विक्रीचा नवा विक्रम; प्रथमच तृतीयपंथी बचत गटाचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सव २०२६मध्ये यंदा कलेसोबत सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचाही आदर्श पाहायला मिळाला. बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाच्या पुढाकारातून सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी अवघ्या नऊ दिवसांत साडेआठ लाख रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. विशेष म्हणजे यंदा प्रथमच तृतीयपंथी बचत गटाने या महोत्सवात सहभाग नोंदवला.
३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित या महोत्सवाला देश-विदेशातील लाखो पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत महापालिकेने महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ आणि विविध उपयोगी साहित्याच्या विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मुंबईकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महिला बचत गटांच्या उत्पादनांना ब्रँडिंग, बाजारपेठेचा अनुभव आणि नव्या ग्राहकांशी थेट संवादाची संधी मिळाली. या उपक्रमातून एकूण आठ लाख ५४ हजार रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.
महिला बचत गटांना प्रशिक्षणाबरोबरच हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास महापालिका कटिबद्ध असून, जागतिक दर्जाच्या व्यासपीठावर मिळालेला हा प्रतिसाद त्यांच्या आर्थिक स्वावलंबनातील महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.

उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
सहभागी गट : १८ नोंदणीकृत महिला बचत गट
विशेष सहभाग : प्रथमच तृतीयपंथी बचत गटाचा समावेश
एकूण विक्री : ८,५४,०००
कालावधी : ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२६
उत्पादने : हस्तकला वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ, विविध उपयुक्त साहित्य
उद्देश : आर्थिक सक्षमीकरण, ब्रँडिंग व बाजारपेठेचा अनुभव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivneri Stampede Police Clarification: शिवनेरीवर चेंगराचेंगरी झालीच नाही, खुद्द जिल्हा पोलिस प्रमुख संदीप गिल यांनी व्हिडिओद्वारे दिली माहिती

तो हत्यारा... माझ्याकडे Video पुरावे आहेत! पाकिस्तानी क्रिकेटपटूवर खळबळजनक आरोप; वर्ल्ड कपच्या तोंडावर पाकड्याचा 'कांड' उघड

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटने एआय जगातील हुशार लोकांना एकत्र आणले- पंतप्रधान मोदी

Solapur Assault Case: साेलापुरात अत्याचार करणाऱ्या तरुणाला २० वर्षे कारावास; अल्पवयीन मुलीच्या गर्भाच्या ‘डीएनए’वरून आरोप झाला सिद्ध!

'38 मध्ये नवऱ्याची भेट, 39 मध्ये लग्न आणि..' जुई गडकरीला कसं हवय वैवाहिक आयुष्य? पोस्ट शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT