कोपरखैराणेत घुमणार शिवगर्जना; शिवजन्मोत्सवाचे आयोजन
डीएम प्रतिष्ठान व युवासेनेच्या पुढाकारातून विविध कार्यक्रमांची रेलचेल
नेरूळ, ता. १८ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा जागर करण्यासाठी नवी मुंबईतील कोपरखैराणे येथे ‘शिवजन्मोत्सव सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. डीएम प्रतिष्ठान आणि युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख दीपेश सुहास म्हात्रे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रथमच राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच करण्यात आले.
गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात सकाळी ९ वाजता मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेने होणार असून, त्यानंतर भजन व शिवभक्तांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत ह.भ.प. अमितजी महाराज म्हात्रे यांचे ‘शिव व्याख्यान’ होणार आहे.
शिवरायांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला असून, परिसरात शिवजयंती उत्सवाबाबत उत्साहाचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.