मुंबई

डिलिव्हरीच्या पैशांवरून वाद

CD

डिलिव्हरीच्या पैशांवरून वाद
तरुणाला घरात घुसून मारहाण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ऑनलाइन ऑर्डरच्या पैशांवरून झालेल्या वादातून डिलिव्हरी बॉय आणि त्याच्या साथीदारांनी एका तरुणाला घरात घुसून मारहाण केली आहे. तसेच त्या तरुणाच्या घराचीही तोडफोड केल्याची घटना घोडबंदर रोड परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील रोहन भानुशाली (वय २५) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. भानुशाली हे वागळे इस्टेट येथील एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. १६ फेब्रुवारीला सायंकाळी भानुशाली यांनी खाद्यपदार्थांची ऑनलाइन ऑर्डर दिली होती. डिलिव्हरीसाठी आलेल्या प्रमोद जाधव याला ३२७ रुपयांचे बिल देण्यासाठी ५०० रुपयांची नोट दिल्यानंतर सुट्ट्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. उर्वरित रक्कम ऑनलाइन देण्याबाबत सांगितल्यावर डिलिव्हरी बॉयने शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. काही वेळाने संबंधित डिलिव्हरी बॉय सहा जणांना घेऊन पुन्हा भानुशाली यांच्या घरी आला आणि त्यांना मारहाण केली. तसेच घरातील खुर्ची फेकून मारत सामानाची तोडफोड केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
ही घटना इमारतीच्या लॉबीपर्यंत सुरू राहिली असून, मित्रांनी मध्यस्थी करून भांडण सोडविल्याचे सांगितले.
याप्रकरणी प्रमोद जाधव आणि त्याचे साथीदार साईनाथ जाधव, संदीप राजभर, ऋषी गिरी, रामानंद भोईर व इतर दोघांविरोधात कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ATS Busted Terror Module : एटीएसची मोठी कारवाई ! नवी दहशतवादी संघटना तयार करण्याचा कट उधळला, अशी होती मोडस ऑपरेंडी

भिवंडीत भाजपला खिंडार! १० नगरसेवकांच्या गटाचा काँग्रेसला पाठिंबा, महापौर पदाच्या निवडीत नवा ट्विस्ट

Bee Attack During Cricket Match : क्रिकेटचा सामना सुरू असताना मधमाशांचा हल्ला, अम्पायरचा मृत्यू,खेळाडूंनी मैदानातून पळ काढत वाचवला जीव

Sangli Kolhapur Road : सांगली -कोल्हापूर चौपदरीकरणाला ब्रेक, प्राधिकरणाकडून टेंडर रद्द; वाहनधारकांना चांगल्या रस्त्याची प्रतिक्षाच

IND vs NED: हार्दिक पांड्याचा 'डबल' धमाका! T20 मध्ये 'असा' पराक्रम करणारा भारताचा पहिलाच ऑलराऊंडर

SCROLL FOR NEXT