खारघर येथे वेदनामुक्ती चिकित्सा शिबिर
खारघर (बातमीदार) : डॉ. जी. डी. पोळ फाउंडेशन व वायएमटी आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या वतीने वेदनामुक्ती चिकित्सा शिबिर घेण्यात येणार आहे. मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी, टाचदुखी तसेच कोपराच्या वेदनांसाठी अधिवर्म, विद्धकर्म व मर्म चिकित्सा पद्धतीने उपचार करण्यात येणार आहेत. हे शिबिर शुक्रवारी (ता. २०) ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था, सेक्टर १६, खारघर येथे होणार आहे. रुग्णांनी पूर्वनोंदणीसह आवश्यक तपासणी अहवाल घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.