शिवजयंतीनिमित्त ‘जय छत्रपती शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचे आयोजन
राष्ट्रभावना, स्वच्छतेचा संदेश देणारा उपक्रम
पालघर, ता. १८ (बातमीदार) : राष्ट्र व राज्याच्या शाश्वत विकासात युवांचे मोलाचे योगदान अधोरेखित करीत केंद्र शासनाच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार तसेच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. १९) ‘जय छत्रपती शिवाजी, जय भारत’ या भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही पदयात्रा सकाळी सात वाजता पालघर येथील हुतात्मा चौकातून प्रारंभ होऊन तहसील कार्यालयापर्यंत मार्गक्रमण करणार असून, सकाळी साडेसात वाजता तिचा समारोप होईल. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची प्रेरणा युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हेतूही यामागे आहे. या पदयात्रेत जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांचे प्रमुख, अधिकारी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवती, खेळाडू, स्काउट गाईड तसेच एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सहभागी विद्यार्थ्यांनी आपापल्या गणवेशात तसेच पारंपरिक व सांस्कृतिक वेशभूषेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी केले आहे.
ढोल-ताशा पथक, लेझीम, योगा, मल्लखांब आणि ऐतिहासिक व पारंपरिक कलापथकांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमणार आहे. ‘जय छत्रपती शिवाजी, जय भारत’ या घोषणांनी पालघरनगरीत राष्ट्रप्रेमाची आणि स्वाभिमानाची भावना अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी व्यक्त केला.
---------
चौकट
स्वच्छता मोहिमेला सुरुवात
पदयात्रेनंतर तत्काळ स्वच्छता मोहिमेच्या पंधरवड्याला सुरुवात करण्यात येणार आहे. राष्ट्रभावना जागृत करणे, सामाजिक सलोखा दृढ करणे, युवांमध्ये नेतृत्वगुण व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे तसेच कला, संस्कृती आणि परंपरा जतन करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.