मुंबई

केडीएमसीत मालमत्ता कर व पाणीपटटीची अभय योजना विचाराधीन नाही

CD

महापालिकेचा मिळकतदारांना इशारा
मालमत्ता कर, पाणीपट्टीसाठी कोणतीही अभय योजना नाही
कल्याण, ता. १९ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात यावर्षी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकीसाठी कोणतीही अभय योजना राबवली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिकेने थकबाकीदारांविरोधात आता कठोर कारवाईचा बडगा उगारला असून, नागरिकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी त्वरित कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विहित मुदतीत कर न भरल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार दरमहा दोन टक्के विलंब शुल्क (दंड) आकारला जात आहे. थकबाकीदारांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करणे, तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता नळजोडणी खंडित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच जप्त केलेल्या मालमत्तांची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याचा निर्णयही महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. करदात्यांनी आपला संपूर्ण मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वेळेत भरून महापालिकेस सहकार्य करावे. कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नागरिकांचा संभ्रम दूर करण्याचे आवाहन
गेल्या दोन आर्थिक वर्षांत (२०२३-२४ आणि २०२४-२५) महापालिकेने अभय योजना राबवली होती. त्यामुळे यावर्षीही अशी योजना येईल, या आशेवर अनेक नागरिक कर भरण्यास उशीर करीत आहेत; मात्र २०२५-२६ या वर्षासाठी अशी कोणतीही योजना लागू करण्याचा मानस प्रशासनाचा नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT