मुंबई

सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रकल्पाला गती द्या

CD

सुपरस्पेशालिटी रुग्णालय प्रकल्पाला गती द्या
कामात विलंब झाल्यास कंत्राटदारावर कारवाईचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबईतील ऐतिहासिक ग्रँट गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज अँड सर जे. जे. रुग्णालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालय प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कामात झालेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त करत एका महिन्यात काम पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
सुमारे ७०० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. विशेषतः गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, प्रगत आयसीयू सुविधा, अवयव प्रत्यारोपण सेवा आणि उच्च दर्जाच्या निदान सुविधा या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात सुरू करण्यात येणार आहेत. त्‍यामुळे राज्यभरातील तसेच देशातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, कोरोनामुळे प्रकल्पात काही प्रमाणात विलंब झाला असला तरी आता कामाला वेग देणे अत्यावश्यक आहे. “सरकारी रुग्णालयांमध्ये खासगी रुग्णालयांच्या तोडीसतोड सुविधा उपलब्ध करून देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. सुपरस्पेशालिटी रुग्णालय हे त्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सुपरस्पेशालिटी रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही या वेळी देण्यात आले.

काही विभाग पीपीपी तत्त्वावर
या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर आयसीयू बेड्समध्ये लक्षणीय वाढ होणार असून, प्रगत तंत्रज्ञानावर आधारित उपचार सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच काही विभाग पीपीपी तत्त्वावर सुरू करण्याचाही विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT