भाईंदर, ता. १९ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमधील नव्याने बांधण्यात येणाऱ्या घरांचा मालमत्ता कर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी आर्थिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
मिरा-भाईंदरमधील भाडेकराराने देण्यात येणाऱ्या मालमत्तांना कराची आकारणी करण्याचा विषय बुधवारी (ता. १८) झालेल्या महासभेपुढे आला होता. या वेळी भाड्याच्या मालमत्तांना करायच्या कर आकारणीसंदर्भात २०१८ मध्ये घेण्यात आलेला निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र त्यासोबतच एप्रिलपासून नव्याने बांधण्यात येणाऱ्या सदनिकांना आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराच्या दरात वाढ करण्यात आली. त्यानुसार निवासी दर दोन रुपये ४० पैशांवरून चार रुपये, तर व्यावसायिक मालमत्तांसाठी चार रुपयाऐवजी सहा रुपये प्रती चौरस फूट या दराने कर आकारणी केली जाणार आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
व्यावसायिक भाड्याच्या मालमत्ता दुर्लक्षित
मिरा-भाईंदरमधील ज्या व्यावसायिक मालमत्ता भाड्याने देण्यात आल्या आहेत, अशांना त्यांच्या वार्षिक भाडेमूल्यानुसार अतिरिक्त कर आकारणी करण्यात येते. शहरात शेकडोच्या संख्येने व्यावसायिक मालमत्ता भाड्याने देण्यात आल्या आहेत, परंतु आतापर्यंत त्यातील केवळ ४२ मालमत्तांनाच महापालिकेकडून अतिरिक्त कर लावण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. महासभेत यावर आक्षेप घेण्यात आला. शहरातील भाड्याने देण्यात आलेल्या व्यावसायिक मालमत्तांचे फेर सर्वेक्षण करण्यात यावे, जेणेकरून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी मागणी नगरसेवक अनिल सावंत यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.