मालाडमध्ये पदपथावर दुचाकी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
मालाड, ता. १८ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील ओर्लेम आणि मीठ चौकी परिसरात पदपथावरून दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. दुचाकीस्वारांकडून वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात आल्या होत्या.
सिग्नल टाळण्यासाठी किंवा झटपट मार्ग काढण्यासाठी अनेक जण पदपथावरून दुचाकी चालवत असल्याचे निदर्शनास आले. तसेच काही दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने वाहन चालवत असल्याने पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिलांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून ये-जा करावी लागत होती. काही प्रसंगी किरकोळ अपघातही घडल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी मालाड पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी पदपथावरून दुचाकी चालवणाऱ्यांविरोधात कारवाई करत दंड आकारला. या कारवाईमुळे स्थानिक आणि पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करत अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.