मुंबई

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

CD

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
मुंबई, ता. १९ ः आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मारक समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. समितीचे अध्यक्ष श्रीराम देवधर, कार्याध्यक्ष राज सराफ, कार्यवाह जयेंद्र सराफ, खजिनदार अनघा बेडेकर, भूषण शितूत, मंदार बेडेकर, पल्लवी सप्रे, नकुल गोलवणकर, नितीन आंबर्डेकर, धनेश कानेटकर, संतोष पालेकर, आदित्य फडके हे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. पालिकेच्‍या कर्मचाऱ्यांचीही दरवर्षीप्रमाणे उपस्थिती होती.
या वेळी श्रीराम देवधर यांनी आद्य क्रांतिवीरांचे गुरू लहुजी साळवे यांचा विशेष उल्लेख करून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तही मानवंदना अर्पण केली. कार्याध्यक्ष राज सराफ यांनी आपल्या देशात, विशेषतः मुंबईत वाढत असलेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर भाष्य करत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. अनघा बेडेकर यांनी समितीमार्फत समाजसेवेसाठी एक रुग्‍णवाहिका खरेदी करण्याची घोषणा केली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT