मुंबई

शिवाजी महाराजांची शिकवण काँग्रेस पुढे नेत आहे

CD

शिवरायांचा ‘सर्वधर्मसमभाव’ हाच काँग्रेसचा पाया!
कल्याणमध्ये डॉ. राजकुमार पातकरांचे प्रतिपादन

कल्याण ता. १९ (वार्ताहर) : ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणून खऱ्या अर्थाने ‘सुराज्य’ निर्माण केले. महाराजांची हीच सर्वधर्मसमभावाची शिकवण आणि विचार काँग्रेस पक्ष आजही पुढे नेत आहे,’’ असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजकुमार पातकर यांनी केले. कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते.

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मानाची वंदना दिली. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मान करून महाराजांनी स्त्रियांचा आदर करण्याची जी शिकवण दिली, तोच आदर्श समाजाने ठेवणे गरजेचे असल्याचे पातकर यांनी नमूद केले. शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य इतके अफाट आहे की, त्यांची जयंती वर्षाचे ३६५ दिवस साजरी केली तरी कमीच पडेल. अशा महापुरुषांचे विचार जपणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

उपस्थित पदाधिकारी
सोहळ्याला जिल्हाध्यक्ष डॉ. राजकुमार पातकर यांच्यासह राजेश वाघमारे, मामा पगारे, सलीम शेख, गोपाळ शर्मा, दशरथ पाटील, अरुण वायले, हाफिज कुरेशी, संकेत लोके, अमोल गायकवाड, शामराव यादव, सुजित सिंह, चंद्रकांत पगारे, हरिश्चंद्र पाटील, जयराज पवार, वैशाली वाघ, किशोर वाघ यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT