मुंबई

वेस्टर्न कॉलेजमध्ये ‘करिअर स्टेशन २०२६’ जॉब फेअरचे आयोजन

CD

वेस्टर्न कॉलेजमध्ये ‘करिअर स्टेशन २०२६’ जॉब फेअरचे आयोजन
२५ ते ३० नामांकित कंपन्यांचा सहभाग; पदवीधर व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
नवी मुंबई, ता. १९ : वेस्टर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड बिझनेस मॅनेजमेंटतर्फे शनिवारी (ता. २१) सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत ‘करिअर स्टेशन २०२६’ या जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सकाळ’ माध्यम प्रायोजित या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सुमारे २५ ते ३० आघाडीच्या कंपन्या सहभागी होणार असून आयटी व नॉन-आयटी क्षेत्रातील विविध नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या जॉब फेअरमध्ये एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, टेक महिंद्रा आणि सदरलँड ग्लोबल सर्व्हिसेस यांसह विविध नामांकित संस्थांचा सहभाग निश्चित झाला आहे. हा उपक्रम सर्व पदवीधर आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी खुला असून उमेदवारांना ऑन-द-स्पॉट मुलाखती, एचआरशी थेट संवाद आणि करिअर पर्यायांचा शोध घेण्याची संधी मिळणार आहे.
इच्छुकांनी रिझ्युमच्या प्रती, ओळखपत्र आणि औपचारिक पोशाखासह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी प्लेसमेंट सेलशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. रोजगारक्षमता वाढवून शिक्षण व उद्योग यांच्यातील दरी कमी करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik Case: टीसीएस प्रकरणात नवा ट्विस्ट! 'एचआर' निघाली प्रेग्नंट; फरार निदा खान मुंबईत

Shaktipeeth Highway : ब्रह्मचैतन्य महाराजांच्या गोंदवल्याची शासनाकडून उपेक्षा? शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात समावेश, पण ग्रामपंचायतीसमोर मोठं आव्हान

पुढचे 24 तास महत्त्वाचे! मीन राशीत 'चतुर्ग्रही राजयोग'; लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने 'या' 5 राशी होणार मालामाल!

Solapur Temperature: साेलापूरचा पारा ४३.४ अंशांवर; तापमानाचा पुन्हा उच्चांक; शनिवारपासून उतरणार पारा, अवकाळी अन्‌ ढगाळ वातावरणाचाही अंदाज!

मित्रानेच केला मित्राचा गेम, मुली पटवण्याची शर्यत अन् पैशांच्या वादातून घेतला बदला; अमरावती प्रकरणात मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT