मुंबई

पीएमश्री शाळा क्र. १ मध्ये सांस्कृतिक महोत्सव जल्लोषात

CD

लहानग्यांच्या बहारदार सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध; मान्यवरांची उपस्थिती
म्हसळा, ता. १९ (बातमीदार) : म्हसळा शहरातील पीएमश्री शाळा क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन म्हसळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या हस्ते झाले. या वेळी नगराध्यक्ष अनिकेत पानसरे, समीर बनकर, शिवसेना तालुका संपर्कप्रमुख अमोल पेंढारी, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, शहरप्रमुख अभय कळमकर, नगरसेविका राखी करंबे, जयश्री कापरे, सरोज म्हशीलकर, केंद्रप्रमुख धर्मा धामणकर, पत्रकार महेश पवार, संतोष उद्धरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत शिर्के, उपाध्यक्ष स्नेहल निजामपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, लावणी, चित्रपट गीत, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर, श्रीधर उमदी, दीपक मुंढे, जयश्री गायकवाड, इंदिरा चौधरी, पाटील, संपदा पोतदार, वैशाली करडे, समिधा वेदक, निधी दर्गे, राखी बिचुकले, राविषा सोनावणे, कोमल चव्हाण, वैभवी कदम यांनी परिश्रम घेतले.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT