नवी मुंबईत ‘हिंद-दी-चादर’ जनजागृतीत दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
३७० शाळा-महाविद्यालयांत विविध उपक्रम; प्रभातफेरी, स्पर्धा व माहितीपटातून गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाची ओळख
नेरूळ, ता. १९ (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त आयोजित जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत दोन लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या विशेष माहितीपटाचे ३७० शैक्षणिक संस्थांमध्ये प्रक्षेपण करण्यात आले असून, सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांची भक्तिगीतेही ऐकविण्यात येत आहेत.
३७४ शाळा-महाविद्यालयांतील दोन लाख ११ हजारांहून अधिक विद्यार्थी व शिक्षक प्रभातफेरीत सहभागी झाले. चित्रकला, निबंध, वक्तृत्व, गायन, घोषवाक्य व प्रश्नमंजुषा स्पर्धांमधून गुरु तेग बहादूर यांच्या त्यागमय कार्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. वाशी, ऐरोली, कोपरखैरणे, नेरूळ, तुर्भे आदी परिसरातील शाळांनी प्रभातफेरी काढत नागरिकांमध्ये जनजागृती केली. गुरुद्वारांच्या पदाधिकाऱ्यांचाही या उपक्रमात सक्रिय सहभाग होता.
२८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी खारघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून व्यापक प्रचार सुरू आहे.
चौकट
ऐक्यभाव आणि बलिदानाची मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत
या उपक्रमातून गुरु तेग बहादूर यांच्या मानवतेच्या रक्षणासाठी केलेल्या अद्वितीय बलिदानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात येत आहे. विविध स्पर्धा, प्रभातफेरी व माहितीपटांच्या माध्यमातून धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता आणि राष्ट्रीय ऐक्याचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश साध्य होत आहे. आगामी खारघर येथील मुख्य समारंभासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.