मुंबई

बविआच्या वतीने शिवप्रतिमा पूजनाला शिवप्रेमींचा उत्साह

CD

बविआच्या वतीने शिवप्रतिमा पूजनाला शिवप्रेमींचा उत्साह

वसई, ता. १९ (बातमीदार ) : वसई पश्चिम बहुजन विकास आघाडी मानव मंदिर कार्यालय येथे गुरुवारी (ता. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती साजरी करण्यात आली. या वेळी माजी महापौर नारायण मानकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, महाराजांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या वेळी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहण्यास मिळाले. या कार्यक्रमाला माजी महापौर मानकर यांच्यासह माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, स्थायी समितीचे माजी सभापती संदेश जाधव, माजी सभापती उमा पाटील, नगरसेवक चंद्रशेखर धुरी, अजय रॉड्रिग्ज, कल्पेश मानकर, नगरसेविका पुष्पा जाधव, प्रमिला पाटील, सुवर्णा पाटील, बविआ कार्यालय समन्वयक व माजी नगरसेवक विजय वर्तक, सचिन घरत, हेमंत परडवा, रवींद्र मांजरेकर, माजी नरसेविका माया तळेकर, मीना अडसूळ, स्नेहल वेदक, बहुजन विकास आघाडी आयटीसेल उपाध्यक्ष दीपक नाईक, सुनील सरवय्या, मनोज शर्मा, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नलावडे, जेष्ठ नागरिक संघाचे सतीश अडसूळ, सागर डिसिल्व्हा, प्रदीप विचारे, हाजी पटेल, राजू हरचेकर, फरजाना खान, संजय अच्छीपालिया, सजू होणखांडे, अक्षय वधानी, आर्यन पटेल आणि वरुण अच्छीपालिया यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि युवा विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वसई : छत्रपती शिवाजी महाराजांना माजी महापौर नारायण मानकर यांनी पुष्पहार अर्पण केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT