मुंबई

गुरुकुल शिक्षण संकुलात शिवभक्तीचा जागर

CD

गुरुकुल शिक्षण संकुलात शिवभक्तीचा जागर

वाणगाव, ता. १९ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून मी वचन देतो की, हे राष्ट्र सुजलाम-सुफलाम, समृद्ध, सर्वधर्मसमभाव, महिलांचा सन्मान राखण्यासाठी, अन्नदान, विद्यादान करण्यासाठी शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही सर्व त्यांचे मावळे म्हणून स्वराज्य उभे करू, अशा शब्दात गुरुकुल शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांनी शिवजयंतीदिनी प्रतिज्ञा केली. आपण प्रत्येकाने शिवाजी महाराजांसारखा जगण्याचा प्रयत्न केला, तर त्यापेक्षा पुण्यवान दुसरा कोणी नाही. शिक्षणाने मिळवलेली पदे ही क्षणभंगुर असतात. पदाला न्याय देण्याकरता आपला अहंभाव सोडून प्रत्यक्षात उतरले पाहिजे. आपला देश सुजलाम-सुफलाम बनविण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गुरुकुल शिक्षण संकुलाचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमात केले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या आनंदात आणि उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते, त्याचप्रमाणे आसनगाव आणि गुरुकुल शिक्षण संकुल नगरीत शिवजयंती मोठ्या अभिमानाने आणि आनंदाने साजरी करण्यात आली. मराठ्यांचा समृद्ध आणि व्यापक सांस्कृतिक वारसा या दिवशी गुरुकुल शिक्षण संकुलात पाहायला मिळाला. शूर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय योगदानाचे गुरुकुल शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी जयंतीनिमित्त स्मरण करण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुकुलात अभिवादन करण्यात आले. गुरुकुल शिक्षण संकुलामध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष विकास पाटील, कार्यकारी संचालिका तृप्ती पाटील, प्राध्यापक वैष्णवी करपे, मोनिका ठाकरे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं अर्धी लढाई जिंकली, पण विजय कठीण! १३१ व घटना दुरुस्ती विधेयक मंजुरीचं आव्हान, फक्त चर्चाच होण्याची शक्यता

Pune Bangalore Highway Expansion : प्रवाशांना दिलासा! पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात, जूनपर्यंत मार्ग पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : दिंडोशी पोलिसांची कारवाई; भोंदू बाबाला अटक

Viral video Nagpur: नागपूरात वाहतूक कोंडीचा गर्भवती मातेला फटका; राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान घटना, मोठी वाहतूक कोंडी, व्हिडीओ व्हायरल..

IPL 2026 सलग दोन विजयानंतर CSK चे टेन्शन वाढलं! संघातील प्रमुख खेळाडू संपूर्ण स्पर्धेतूनच झाला बाहेर

SCROLL FOR NEXT