मुंबई

रविवार वेळापत्रकामुळे प्रवाशांचे हाल !

CD

रविवार वेळापत्रकामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सुट्टीचा दिवस आणि शहरभर निघालेल्या शोभायात्रा पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना गुरुवारी लोकलच्या प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. सार्वजनिक सुट्टीमुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेकडून रविवार वेळापत्रकानुसार लोकल धावविण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीमुळे शासकीय कार्यालयांना सुट्टी असली तरी खासगी कार्यालये, उद्योग-व्यवसाय सुरूच होते. परिणामी, कामावर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती; मात्र लोकलची संख्या कमी असल्याने फलाटांवर आणि गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी उसळली. सकाळच्या तसेच सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना गाड्यांमध्ये चढणे-उतरणेही कठीण झाले.

प्रवाशांची नाराजी
दादर, कुर्ला, वांद्रे, अंधेरी, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होती. अनेक ठिकाणी गाड्या आधीच भरून येत असल्याने पुढील लोकलची वाट पाहण्याशिवाय प्रवाशांना पर्याय उरला नाही. काही ठिकाणी महिलांच्या डब्यांतही प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र होते. दरम्यान, सणासुदीच्या दिवशीही सुट्टीच्या वेळापत्रकानुसार लोकल चालविल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. शासकीय सुट्टी असली तरी खासगी कार्यालये सुरू असतात, हे लक्षात घेऊन लोकलची संख्या वाढवायला हवी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली. सण, उत्सव किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी प्रत्यक्ष प्रवासीभार लक्षात घेऊन विशेष फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी आता प्रवासी संघटनांकडूनही पुढे येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT