मुंबई

मुस्लीम फळविक्रेत्या सलमाकडून शिवरायांना नित्य अभिवादन

CD

धर्माच्या भिंती ओलांडणारी निस्वार्थ ‘शिवभक्ती’
टिटवाळ्यातील ‘सलमा’चा रोज शिवरायांना मुजरा

टिटवाळा, ता. १९ (वार्ताहर) : शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी घोषणाबाजी, हारतुरे आणि कॅमेऱ्यांचा लखलखाट पाहायला मिळतो. मात्र, टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ एक असा ‘शिवभक्त’ चेहरा आहे, जो कोणत्याही प्रसिद्धीशिवाय दररोज शिवरायांना अभिवादन करतो. ही भक्ती कोणत्याही राजकारणी किंवा पदाधिकाऱ्याची नसून, ती आहे एका साध्या मुस्लिम फळविक्रेत्या महिलेची

टिटवाळा पूर्व स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य म्युरल शिल्पाशेजारी सलमा गेली अनेक वर्षे फळविक्री करते. पहाटे दुकान मांडण्यापूर्वी ती या परिसराची झाडलोट करते, जागा पाण्याने स्वच्छ धुते आणि त्यानंतर हात जोडून महाराजांना मुजरा करूनच आपल्या व्यवसायाला सुरुवात करते. हे स्मारक झाल्यापासून आजवर तिच्या या नित्यक्रमात कधीच खंड पडलेला नाही.

सलमा ही निराधार असून, फळविक्रीतून आपला उदरनिर्वाह करते. विशेष म्हणजे, नुकतीच तिच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली असून, तिला दैनंदिन कामे करताना त्रास होतो. मात्र, तरीही शिवरायांच्या शिल्पाची स्वच्छता आणि पूजा ती न चुकता पार पाडते. "राजे सगळ्यांचे होते," असे ती अगदी सहजपणे सांगते.

समाजाला मूक, पण ठाम संदेश
आजच्या ध्रुवीकरणाच्या काळात सलमाची ही कृती समाजाला मोठा संदेश देते. केवळ जयंतीपुरते मर्यादित न राहता, निस्वार्थ भावनेने शिवरायांचे पावित्र्य जपण्याचे काम ही महिला करत आहे. फोटोसेशन आणि घोषणांच्या पलीकडे जाऊन, कृतीतून शिवरायांचे वारसदार कसे व्हावे, याचे उत्तम उदाहरण सलमाने घालून दिले आहे.

मनाची श्रीमंती मोठी
"शिवरायांना अभिवादन केवळ उत्सवांनी होत नाही, तर ते मनातील आदराने आणि रोजच्या कृतीतून होते. पावित्र्य जपण्यासाठी मोठी पदे लागत नाहीत, तर लागते ती फक्त मनाची श्रीमंती," अशा भावना परिसरात व्यक्त होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT