मुंबई

उल्हासनगर टीडीआर घोटाळ्यावर बच्चू कडू आक्रमक

CD

उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : महापालिकेतील कथित टीडीआर घोटाळा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी ठोस कारवाई होत नसल्याचे सांगत आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी थेट मंत्रालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नगरविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्या दालनाबाहेर १२ मार्चला आंदोलन करणार असल्याचे त्यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
२८ ऑगस्टला झालेल्या बैठकीत टीडीआरसंदर्भात स्थगिती देण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले होते. त्यापैकी केवळ टीडीआर क्र. १४ वरच स्थगिती देण्यात आली. टीडीआर क्र. १७ व १८ बाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. विशेष म्हणजे संबंधित टीडीआरच्या विक्रीवर आधारित बांधकामांनाही स्थगिती देण्यात आलेली नसल्याने संशय अधिक गडद झाला आहे, असे कडू म्हणाले. या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांनीही १३ फेब्रुवारीला पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती. वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने बच्चू कडू यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि महापालिका प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT