कासा, ता. १९ (बातमीदार) : डहाणू परिसरात बिबट्याचा वावर अद्याप सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. डहाणू गावातील अजय राणा यांच्या घराजवळील गल्लीत बुधवारी (ता. १८) पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास बिबट्या जात असल्याचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पुन्हा कैद झाला. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.
काही दिवसांपूर्वी याच भागातील एका बंदवाडीत बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; मात्र तो कुंपणावरून उडी मारून पसार झाला. गेल्या काही दिवसांत डहाणू पारनाका-तलाव परिसरातही बिबट्याचा वावर असल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात डहाणू वन विभागाचे अधिकारी नवीन माच्छी यांनी सांगितले, की संबंधित भागात पाळत ठेवण्यात येत असून ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक त्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नागरिकांनीही सतर्कता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्य वर्दळीच्या भागात बिबट्याचा वावर आढळत असल्याने लहान मुले, तसेच रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.