मुंबई

महाशिवरात्रीनिमित्त शिवलीलामृत पारायण

CD

मुरबाड, ता. १९ (वार्ताहर) : तालुक्यातील शिरवळी (मा.) येथील शिवअरेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महाशिवरात्रीनिमित्त शिवलीलामृत पारायण घेण्यात आले. तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय (ओम शांती) यांच्या वतीने १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना करून भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. या वेळी आरोग्य, स्वच्छता, अध्यात्म आणि १२ ज्योतिर्लिंगांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हजारो भक्तांनी दर्शन घेत उपवासाच्या फराळाचा लाभ घेतला. तालुक्यातील संगमेश्वर येथील मंदिर बंद असल्याने ‘प्रति संगमेश्वर’ लिंग दर्शनासाठी विशेषरित्या स्थापन करण्यात आले होते. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. ह.भ.प. रामभाऊ दळवी यांच्या उपस्थितीत भाविकांनी दर्शन घेतले. कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT