मॉडेल इंग्लिश हायस्कूलमध्ये साहसी खेळ
पालखी मिरवणुकीने कल्याण पूर्व दुमदुमले
कल्याण, ता. १९ (बातमीदार): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त कल्याण पूर्वेतील ''द ईस्ट कल्याण वेलफेअर सोसायटी'' संचलित मॉडल इंग्लिश हायस्कूल व महाविद्यालयात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. पारंपारिक वेशभूषा, साहसी खेळ आणि पोवाड्यांच्या सादरीकरणामुळे हा सोहळा कल्याणकरांच्या कौतुकाचा विषय ठरला.
सकाळी आठ वाजता कल्याण पूर्व परिसरातून शिवरायांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक पेहराव केलेले शेकडो विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. ''जय भवानी, जय शिवाजी''च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मिरवणुकीनंतर शाळेच्या प्रांगणात शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. शाळेचे समन्वयक सूर्यकांत तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्याला संस्थेचे पदाधिकारी भगवान भोईर, नरेंद्र सूर्यवंशी, निलेश शिंदे, महेश गायकवाड, आनंदन नायर यांसह प्राचार्य डॉ. शिरीन थॉमस गोंसालवेझ, उपप्राचार्य राजाराम कदम आणि विविध विभागांच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या. मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पालक आणि शिक्षकांच्या सहभागामुळे यावर्षीचा शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत चैतन्यमय वातावरणात पार पडला.
चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि पोवाडे
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी सादर केलेले साहसी खेळ. ढोल-लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांनी लाठी-काठी आणि तलवारबाजीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बुलंद पोवाड्याने इतिहासातील शौर्याचे प्रसंग जिवंत केले. याशिवाय शिवरायांच्या जीवनावर आधारित नृत्ये आणि प्रेरणादायी भाषणांनी कार्यक्रमात रंगत आणली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.