मुंबई

भव्य शिवमंदिर शिवगर्जनांनी दुमदुमला

CD

भिवंडी, ता. १९ (वार्ताहर) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६व्या जयंतीनिमित्त भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात शिवभक्तांची अलोट गर्दी उसळली होती. महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य शिवमंदिर म्हणून ओळख निर्माण झालेल्या या ठिकाणी दिवसभर धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले होते.
मराडे पाडा येथील शिवमंदिराच्या लोकार्पणानंतर प्रथमच येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त संपूर्ण मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट, रांगोळ्या आणि रोषणाईने नटला होता. पहाटेपासूनच दर्शनासाठी शिवभक्तांनी रांगा लावल्या होत्या. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक राजू चौधरी यांच्या हस्ते सपत्नीक शिवरायांचा प्रतिकात्मक राज्याभिषेक सोहळा पार पडला. त्यानंतर महाराजांची आरती करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत ‘महारक्तदान शिबिर’ झाले. शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.
कार्यक्रमात पोवाडे गायन, शिवगीत, भजन; तसेच विद्यार्थ्यांकडून लेझीम सादरीकरण आणि शिवगर्जना सादर करण्यात आली. देशभक्ती आणि शिवचरित्राची प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमांना उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. मराडे पाडा येथील या मंदिरात प्रथमच साजऱ्या झालेल्या शिवजयंतीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवभक्तांच्या उपस्थिती आणि विविध कार्यक्रमांमुळे हा सोहळा संस्मरणीय ठरल्याची माहिती चौधरी यांनी दिली.

शिस्तबद्ध नियोजन
शिवजयंतीनिमित्त मंदिर परिसरात शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी स्वतंत्र रांगा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती. दिवसभर भक्तांची वर्दळ कायम होती.


भिवंडी : छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

Gas Cylinder Black Market : घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT