मुंबई

जव्हार शहरात रयतेच्या राजा शिव छत्रपतीला मानाचा मुजरा

CD

जव्हार शहरात रयतेचा राजा शिव छत्रपतींना मानाचा मुजरा

जव्हार, ता. १९ (बातमीदार) : जव्हार शहरात शिवजयंती उत्सव हा जव्हार नगर परिषद, शिवजयंती उत्सव समिती तसेच शहरातील अनेक भागांत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या वेळी ठिकठिकाणी निरनिराळ्या उपक्रमाचे मोठ्या जल्लोषात आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सर्वत्र रयतेचा राजा शिव छत्रपती यांच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमले होते, तर सर्वच रस्ते भगवे होऊन एक प्रसन्न वातावरण अनुभवण्यास आले.
शिवजयंती उत्सव समीतीचे सभापती चेतन बिडलानी यांच्या हस्ते आनंद दिघे चौकात सकाळी १० वाजता महाराजांना दुग्धाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर धर्मवीर आनंद दिघे चौकात शिवव्याख्याते कृष्णा मुरमे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात दुपारी १२ वाजता शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक अशा शिरपामाळ येथे विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये व उत्सवाचे सभापती चेतन बिडलानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, शिवप्रतिमेचे पूजन जव्हार नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पूजा उदावंत, उपनगराध्यक्ष कुणाल उदावंत, उपसभापती तुषार मेढे,सचिव सचिन शिंदे, मुख्याधिकारी मानिनी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सर्वच कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य जव्हार नगर परिषदेचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, उपस्थित शिवभक्त यांच्या हस्ते शिव पुतळ्याचे पूजन व अभिवादन करण्यात आले त्यानंतर शिरपामाळ येथुन मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शहरात यशवंत नगर, मोर्चा डॉ. आंबेडकर पथ, मुकणे काॅलणी, तारपा चौक, या ठिकाणीदेखील शिवप्रतिमेच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संध्याकाळी ५ वाजता शहरातील यशवंत नगर येथून शिवप्रतिमेच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, बालक, बालिका व महिलांनीदेखील मोठ्या प्रमाणावर पारंपारिक पोशाख परिधान करून सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Danoli Village Shutdown Protest : “भरतेशला न्याय मिळालाच पाहिजे”, दानोळी गाव बेमुदत बंद; जिवाभावाचा भरतेश गेला भविष्य सुरक्षितेसाठी गाव एकवटलं

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT