परप्रांतीयाकडून आदिवासींना
मारहाण; गुन्हा दाखल
खालापूर, ता. १९ (बातमीदार) ः कलोते गावच्या हद्दीत असलेल्या फार्महाउसवर मारहाणीची घटना समोर आली आहे. कामगार असलेल्या मुन्ना माखिजा आणि सूरज मिश्रा या दोघांनी दारूच्या नशेत टपरी दुकानदार राम शिंगवा आणि त्याचे वडील कमलू शिंगवा यांना मारहाण केल्याचे, तर भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती केलेल्या पाच महिलांनादेखील मारहाण करण्यात आली आहे.
खालापूर पोलिस ठाणे हद्दीत बुधवारी (ता. १८) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कलोते मोकाशी ठाकुरवाडी येथे राम शिंगवा टपरीवर असताना मुन्ना आणि सूरज मद्यधूंद अवस्थेत आले. टपरीच्या येथे ठेवलेले पाण्याचे माठ टपरीच्या दरवाजावर आपटून व खुर्चीची मोडतोड करून नुकसान केले केली. राम आणि त्याच्या वडिलांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. त्या वेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या गावातील महिला ठमी दरवडा, लक्ष्मी शिंगवा, राधिका शिंगवा, गुलाब शिद, चिमी शिंगवा यांनादेखील मुन्ना आणि सूरजने हाताबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत खालापूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.