वाड्यातील कंपनीला भीषण आग
वाडा, ता. २० (बातमीदार)ः वाडा तालुक्यातील उसर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका कंपनीला गुरुवारी (ता. १९) पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐरोटेक एनर्जी प्रा. ली. या कंपनीत कुलिंग फॅन, एअर कुलेड कंडेन्सर व कुलिंग टाॅवर बनवण्यात येत असून, या कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाडा नगर पंचायतीच्या अग्निशमन दलाची एक गाडी बोलवण्यात आली होती. दोन तासांच्या अथक प्रयत्नाने अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले, पहाटे साधारण ४ वाजताच्या सुमारास ही आग लागली. आग लागण्याचे कारण समजलेले नाही, परंतु या आगीत कच्च्या मालाचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक विवेक गांधी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.