मुंबई

मदत करण्याच्या बहाण्याने ग्राहकांची एटीएम लुट

CD

मदत करण्याच्या बहाण्याने
एटीएममध्ये तीन ग्राहकांची फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० ः एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या तीन ग्राहकांना लक्ष्य करत भामट्यांनी हातचलाखीने तब्बल एक लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना कल्याण पूर्वेत उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कल्याण पूर्वेतील लिंक रोडवरील एका एटीएममध्ये नंदकिशोर रमेश पाटील आणि वैभव प्रकाश आव्हाळे पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी चार जणांनी त्यांना ग्राहक असल्याचे भासवत एटीएममध्ये प्रवेश करून हातचलाखीने संबंधितांचे एटीएम कार्ड मशीनमध्ये अडकवले. कार्ड बाहेर येत नसल्याने गोंधळलेल्या ग्राहकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांनी गुप्त पिन क्रमांक विचारून घेतला. त्यानंतर त्याच कार्डचा वापर करून खात्यातील रक्कम काढून भामटे पसार झाले. यानंतर खडेगोळवली परिसरातील एटीएममध्येही अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आली. यशवंत हिरामण मगरे हे पैसे काढत असताना चार जणांनी कार्ड अडकवून मदत करण्याचा बहाणा केला आणि गुप्त पासवर्ड मिळवून खात्यातील रक्कम काढून घेतली. या तिन्ही घटनांमध्ये मिळून एकूण एक लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. नंदकिशोर पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे. याबाबत नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT