मुंबई

शिवशाही दुकानांच्या ई-लिलावला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

शिवशाही दुकानांच्या ई-लिलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद
रात्री ९पर्यंत चालला लिलाव; दुपटीहून अधिक बोली लागल्याचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने विक्रीसाठी काढलेल्या ३० दुकानांच्या ई-लिलाव प्रक्रियेला खरेदीदारांकडून उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हा लिलाव होणार होता; मात्र खरेदीदारांनी सायंकाळी ५नंतरही बोली लावणे सुरू ठेवल्याने रात्री ९पर्यंत लिलाव सुरू होता. यामध्ये ११४ बोलीधारकांनी भाग घेतला होता. तसेच अनेक दुकानांना दुपटीहून अधिक बोली लागल्याचे सहभागी झालेल्या बोलीधारकांनी सांगितले. या लिलावाचा सोमवारी निकाल जाहीर होणार आहे.
शिवशाही या सरकारी कंपनीचे मुंबईत मानखुर्द आणि शिवडी येथे व्यवसायिक गाळे आहेत. त्याची ई-लिलावाच्या माध्यमातून विक्री जाहीर केली होती. त्यानुसार ११४ इच्छुकांनी लिलावासाठी नोंदणी करतानाच १० दुकानांच्या मूळ किमतीच्या १० टक्के अनामत रक्कम भरली होती. त्यानुसार गुरुवारी ई-लिलाव प्रक्रिया पार पडल्याचे शिवशाहीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोटींचा महसूल
बोली प्रक्रिया सायंकाळी ५पर्यंत खुली होती. ५ वाजण्याच्या आधी एक मिनिट जरी एखाद्याने बोली लावली तर त्याच्या स्पर्धकाला बोली लावण्यासाठी वाढीव १० मिनिटे मिळतात. त्यामुळे बोली लावण्यात झालेल्या चढाओढीमुळे रात्री ९ वाजेपर्यंत प्रक्रिया चालल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अनेक दुकानांसाठी दुप्पट-अडीच पट बोली लावल्याचे सहभागी झालेल्या बोलीधारकांनी सांगतिले. त्यामुळे ३० दुकानांच्या गाळ्याच्या विक्रीतून शिवशाहीला १५-२० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, १० टक्के अनामत रकमेच्या माध्यमातून शिवशाहीकडे तीन कोटी ३० लाख ४१ हजार रुपये जमा झाले आहेत.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT